Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये

पंतप्रधान-जम्मू-काश्मीरमध्ये


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरसाठी 80 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. श्रीनगर इथल्या शेर-ए-कश्मीर स्टेडियममधील आपल्या भाषणांत मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कश्मीरियत, जम्हूरियत, इंसानियतच्या संदेशाचे स्मरण केले.

भारताच्या सुफी परंपरेविषयी बोलतानाच पंतप्रधानांनी सांगितले की, ‘भारत कश्मीरियत शिवाय अपूर्ण आहे.’

पंतप्रधानांनी राज्याच्या लोकांचे जम्हूरियतमधील त्यांच्या विश्वासाबद्दल कौतुक केले आणि सांगितले की, जम्मू काश्मीरची प्रगती ही माणुसकीवर आधारित असायला हवी.

मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’साठी कार्य केले आहे आणि म्हणूनच देशाच्या सर्व भागाचा विकास होणे अनिवार्य आहे. जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा त्या गत दिवसांच्या वैभवामध्ये परत जायला हवे जिथे संपूर्ण भारतातील लोक फक्त जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन करायला मिळावे याकरता खास बचत करायचे. पर्यटनाव्यतिरिक्त पश्मीना शाल आणि केसर उत्पादनावरील देखील लक्ष केंद्रीत केले जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी 450 मेगावॅट क्षमतेच्या बागलिहार अणुऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्‌घाटन केले आणि रामबन, चंदरकोटे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 च्या उधमपूर-रामबन आणि रामबन-बैनिहाल रस्त्यांच्या चौपदरीकरण कार्याचे भूमीपूजन केले. नवीकरण ऊर्जा वापरासंदर्भात केंद्र सरकारच्या उपक्रमांची आणि नवीकरण ऊर्जेच्या 175 जी डब्ल्यू क्षमतेच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याबद्दल देखील पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केले. त्यांनी सांगितले हवामान बदलासारख्या वैश्विक समस्येचा सामना करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

श्रीनगरमध्ये मोदींनी जाहीर केलेले 80 हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे जम्मू काश्मीरला नवीन बळकटी प्रदान करेल तसेच युवकांसाठी रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून देईल.

S. Mhatre/S.Tupe/N.Sapre