पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 ते 20 डिसेंबर 2015 दरम्यान गुजरातमधील कच्छ जिल्हयाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पंतप्रधान भूजला जाणार आहेत. यावेळी विख्यात स्वातंत्र्यसेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांना लंडनच्या ऑनरेबल सोसायटी ऑफ इनर टेंपलने मरणोत्तर “बहाल” पुन्हा बाला करण्याचे प्रमाणपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडे सुपूर्द करतील. पंतप्रधानांच्या नोव्हेंबर 2015 मधील ब्रिटन दौऱ्याच्या वेळी हे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते.
यानंतर पंतप्रधान धोरडोला रवाना होतील. 18 ते 20 डिसेंबर 2015 दरम्यान पंतप्रधान पोलिस महासंचालकांच्या परिषदेत सहभागी होतील.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai