Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी घेणार तीन द्विपक्षीय बैठका- मॉरिशसचे पंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत या तीन बैठकांमध्ये होणार चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटर संदेशात माहिती दिली आहे की ते आज संध्याकाळी नवी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी तीन द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. यामध्ये मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याबरोबरच्या बैठकीचा समावेश असेल.

या बैठकींमुळे भारताच्या या देशांबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि विकासात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:

आज संध्याकाळी माझ्या निवासस्थानी होणाऱ्या तीन द्विपक्षीय बैठकींसाठी मी उत्सुक आहे. मी मॉरिशसचे पंतप्रधान @कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि @POTUS @JoeBiden यांना भेटणार आहे. या बैठकांमुळे भारताच्या या देशांबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि विकासात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai