Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुवेतचे अमीर यांच्यात दूरध्वनीवरून संवाद


नवी दिल्ली, 9 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर, महामहिम शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील बदलत्या सुरक्षा स्थितीवर आपले विचार व्यक्त केले.

पंतप्रधानांनी वाढत्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि कुवेतच्या सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेवरील हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करत असल्याचा  पुनरुच्चार केला.

शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्स्थापित  करण्यासाठी तणाव कमी करणे, संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

कुवेतमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या भारतीय समुदायाच्या निरंतर कल्याण आणि सुरक्षेकडे  वैयक्तिक लक्ष दिल्याबद्दल पंतप्रधानांनी महामहिम अमीर यांचे आभार मानले.

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai