पीएम्इंडिया
ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
पंतप्रधान बर्नहॅम यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी भारत-ब्रिटन व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठीच्या विविध मार्गांचा उहापोह केला. भारत-युके व्हिजन 2035 च्या अनुषंगाने, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, स्वच्छ उर्जा, शिक्षण आणि दोन्ही देशांच्या जनतेचे परस्पर संबंध यांच्यासह प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी दृढ करायला दोन्ही नेत्यांनी मान्यता दिली.
भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापारी कराराच्या अलीकडेच झालेल्या अंमलबजावणीचे देखील त्यांनी स्वागत केले आणि दोन्ही देशांतील लोकांची सामायिक समृद्धी तसेच हितासाठी या करारातील व्यापार आणि गुंतवणूकविषयक क्षमतेचा संपूर्ण वापर करून घेण्याप्रतीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर स्वारस्याच्या क्षेत्रीय तसेच जागतिक मुद्द्यांबाबत आपापले विचार मांडले.
दोन्ही नेत्यांनी यापुढे एकमेकांच्या संपर्कात राहायला सहमती दर्शवली.
***
निलिमा चितळे/संजना चिटणीस/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Delighted to speak with Prime Minister of the United Kingdom Andy Burnham. Congratulated him on assuming office and conveyed my best wishes for a successful tenure.
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2026
We agreed to work together across sectors such as technology, innovation, defence, security, clean energy,…