Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ ओमान पुरस्काराने सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ ओमान पुरस्काराने सन्मानित


नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025

ओमानचे सुलतान महामहिम हैथम बिन तारिक यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना भारत-ओमान संबंधांमधील त्यांच्या अतुलनीय  योगदानाबद्दल आणि दूरदर्शी  नेतृत्वासाठी ‘ऑर्डर ऑफ ओमान’ पुरस्काराने सन्मानित केले.

पंतप्रधानांनी हा पुरस्कार दोन्ही देशांमधील शतकानुशतकांच्या घनिष्ठ मैत्रीला समर्पित केला आणि हा पुरस्कार म्हणजे भारताची  140 कोटी जनता आणि ओमानच्या जनतेमधील परस्पर जिव्हाळा आणि प्रेम यांना केलेले हे अभिवादन असल्याचे सांगितले.

दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांना  70 वर्षे पूर्ण होत असतानाच  पंतप्रधानांच्या ओमान भेटीत त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने, या प्रसंगाला आणि धोरणात्मक भागीदारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महामहिम सुलतान काबूस बिन सईद यांनी 1970 मध्ये सुरु केलेला ‘ऑर्डर ऑफ ओमान’ हा सन्मान सार्वजनिक जीवनातील आणि द्विपक्षीय संबंधांमधील योगदानाबद्दल निवडक जागतिक नेत्यांना प्रदान करण्यात आला आहे.

 

निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai