पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूतील चेन्नई इथल्या जयगोपाल गारोडिया हिंदू विद्यालय मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. आजच्या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शिव आणि शक्तीच्या या पवित्र भूमीला भेट देता आल्याबद्दल अत्यंत आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माता सरस्वतीच्या भक्तांना भेट घेताना युवा वर्गातली सकारात्मक ऊर्जा, उत्सुकता आणि चैतन्यमयी उत्साह अनुभवता आल्याने या सणाची अत्यंत शुभ सुरुवात झाली असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यांत आपल्याला भारताचे भविष्य दिसत असल्याचे ते म्हणाले.
युवा पिढीतील अफाट क्षमतांचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. आजच्या युवा वर्गात विकसित भारताच्या संकल्पाची मुख्य ताकद बनण्याची तीव्र इच्छा आहे. हा राष्ट्रीय संकल्प साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिनव कल्पना आणि उपाययोजनाा देशासोबतच संपूर्ण जगाच्या भविष्याला आकार देतील असे ते म्हणाले. आज जग उपाययोजनांचा शोध घेत आहे आणि ते देण्याची क्षमता युवा वर्गात आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी खूप स्वप्ने पाहावीत असे प्रोत्साहन त्यांनी दिले. प्रत्येक युवा प्रतिनिधीने देशभरात सध्या निर्माण होत असलेल्या अफाट संधींच्या अवकाशात स्वतःचे भविष्य पाहावे असे आवाहनही त्यांनी केले. आजचे युग अभूतपूर्व शक्यतांचे आहे, अशावेळी सामूहिक राष्ट्रीय स्वप्न युवा वर्गाच्या अवाक्यातले आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकत्र मिळून, आपण हे साध्य करून दाखवू, असे ते म्हणाले.
या निमित्ताने पंतप्रधानांनी आपला वैयक्तिक अनुभवही सामायिक केला. आपल्या आजच्या भेटीमागच्या प्रेरणेबद्दल त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी नागरकोइल इथे गिरीजा अम्मा आणि काही मुलांशी झालेल्या भेटीचे त्यांनी स्मरण केले. देशाच्या भविष्याबद्दलची गिरीजा अम्मा यांची दृढ निष्ठा, आत्मविश्वास आणि दृढ समर्पण वृत्तीने आपल्या मनावर अभूतपूर्व छाप सोडली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पहिल्या भेटीत दिलेले वचन आपण पूर्ण करत आहोत. गिरीजा अम्मा यांचे आपुलकीचे भाव आणि या ऐतिहासिक संस्थेबद्दल आपल्या असलेला तीव्र आदर यांमुळेच आपण सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे हे निमंत्रण स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या 50 वर्षांच्या वाटचालीबद्दल त्यांनी विश्व हिंदू विद्या केंद्र आणि संपूर्ण हिंदू विद्यालय परिवाराचे अभिनंदनही केले.
या संस्थेच्या अत्यंत प्रेरणादायी वाटचालीचा आढावाही त्यांनी आपल्या संबोधनातून घेतला. विश्व हिंदू विद्या केंद्राची सुरुवात 1975 मध्ये चेन्नईच्या वेस्ट मांबलममध्ये केवळ सात विद्यार्थी आणि मर्यादित संसाधनांसह एका अतिशय लहान शाळेच्या रूपात झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक सुविधांचा अभाव असताना, तसेच कायमस्वरूपी इमारत नसतानाही, सुरुवातीच्या टप्प्यावर आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि संस्थेला पुढे नेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती दाखवल्याबद्दल तसेच सेवा करत राहण्याच्या भावनेवर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी संस्थापकांचे कौतुक केले. यामुळेच प्रत्येक अडचणीवर मात करत ही संस्था सातत्याने पुढे जात राहिली, असे ते म्हणाले.
एका लहानशा प्रयत्नातून सुरू झालेल्या या प्रवासाचा झालेला प्रचंड विस्तार अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी सुरुवातीच्या लहानशा प्रयत्नाचे कालांतराने अत्यंत मोठ्या शैक्षणिक चळवळीत रूपांतर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी नमूद केले की संस्थेचा सद्यस्थितीतला संपूर्ण राज्यातील व्यापक विस्तार आणि प्रभाव आहे. “आज तामिळनाडूच्या विविध भागांत 15 संस्थां कार्यरत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या उभारणीत वाटा उचलणाऱ्या संस्थापकांविषयी गौरवपूर्ण उल्लेख करताना, पंतप्रधानांनी जयगोपाल गरोडिया यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. हिंदू विद्यालयाच्या यशस्वी प्रवासासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले अशा सर्व शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी यांच्याप्रति त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. “पन्नास वर्षे समर्पणाची, पन्नास वर्षे बांधिलकीची, पन्नास वर्षे तरुण पिढीला आकार देण्याची” असे गौरवपूर्ण उद्गार मोदी यांनी काढले.
शैक्षणिक ज्ञानाबरोबर राष्ट्रभक्तीच्या मूल्यांची सांगड घातल्याबद्दल संस्थेचा गौरव करताना, पंतप्रधानांनी, ‘मन की बात’कार्यक्रमात केलेल्या गिरीजा अम्मा ज्यांनी बुद्धीकौशल्याने देशाच्या सैनिकांसाठी दररोज केवळ एक रुपयांची बचत कऱण्यासाठी मुलांना प्रेरीत केले होते. यांचा उल्लेख केला. या संकल्पात सहभागी हजारो मुलांनी चाळीस लाख रुपये जमा करण्याच्या सामूहिक प्रयत्नांच्या अद्भूत प्रभावाची त्यांनी प्रशंसा केली. “खरोखरच किती प्रेरणादायी उदाहरण आहे हे!” असे अधोरेखित केले.
सावकाशीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांच्या अफाट ताकदीवर भर देताना पंतप्रधानांनी छोटेसे योगदानही समाजावर मोठा सकारात्मक प्रभाव पाडू शकते, असे नमूद केले. नैसर्गिक आपत्ती काळात गरजूंना मदत करणे असो किंवा स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभागी होणे असो, हिंदू विद्यालय परिवाराची मूल्यांचा महान वारसा कृतीशीलतेने जोपासल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. “एक छोटासा प्रयत्नही खूप मोठा प्रभाव पाडू शकतो”, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
प्राचीन ज्ञानाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी महान संत थिरूवल्लुवर यांना अभिवादन केले आणि आजच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिकवणुकीचे समकालीन महत्त्व अधोरेखित केले. अलीकडील एका धोरणात्मक भेटीचा अभिमानाने उल्लेख करत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना तिरुक्करलचा रशियन अनुवाद भेद दिल्याची माहिती सामाईक केली. ” त्यांची शिकवण तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे” असे मोदी यांनी नमूद केले.
थिरुक्कुरल मधील कालातीत मार्गदर्शनावर भाष्य करताना, पंतप्रधानांनी या ग्रंथाचे वर्णन आयुष्यभर शिकत राहाणाऱ्यांसाठी एक उत्तम मार्गदर्शक असे केले. त्यांनी अधोरेखित केले की, थिरुवल्लुवर यांच्या प्रसिद्ध कुरलचा उल्लेख करताना, आत्मसात केलेले ज्ञान प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात अमलात आणणण्याच्या गरजेवर भर दिला असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा धडा आहे. “एखादी गोष्ट शिकण्यासोबतच, ती जीवनात आचरणात आणणेही तितकेच गरजेचे आहे,” असे ठाम प्रतिपादन मोदी यांनी केले.
राष्ट्राला बांधून ठेवणारे सखोल सांस्कृतिक बंध अधोरेखित करताना पंतप्रधानांनी, महाकवी भारथियार काशीमध्ये आलेल्या आध्यात्मिक आणि राष्ट्रजाणिवेच्या अनुभवाने अत्यंत प्रभावित झाल्याचे नमूद केले. त्यांनी, विद्यार्थ्यांना या कवींचे व्यापक आयुष्य आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यास आणि त्यातून प्रेरणा घेण्यास प्रोत्साहित केले. “आध्यात्मिक आणि राष्ट्र जाणिवेने प्रभावित काशीमधील वातावरणाचा त्यांच्या विचारांवर खोल प्रभाव पडला होता,” असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले.
आपल्या स्वतःच्या लोकसभा मतदार संघाचा सामायिक वारशाशी संबंध जोडत पंतप्रधानांनी काशीचे लोक आजही महाकवी भारथियार यांची आत्मियतेने आठवण काढतात, असे सांगितले. त्यांनी तरुणांना आवाहन केले की, अचमिल्लई, अचमिल्लई (निर्भय, निर्भय) हा भारथियार यांचा प्रसिद्ध मंत्र अंगीकारावा आणि आपल्या कल्पना आणि स्वप्नांचा जिद्दीने पाठपुरावा करावा. “मोठी स्वप्ने, वेगळे विचार आणि निर्भय व्हा,” यावर मोदी यांनी भर दिला.
स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी त्यांची देशाविषयीची सखोल समज, ही त्यांच्या विस्तृत प्रवासातून आणि विविध प्रदेशातील लोकांशी थेट संवाद साधून आणि त्यांच्याकडून शिकत विकसित झाल्याचे सांगितले. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला कन्याकुमारी आणि काश्मीर दरम्यान काढलेल्या एकता यात्रेदरम्यान त्यांच्या सहभागाच्या आठवणींना आणि त्या दरम्यान गिरीजा अम्मा यांच्याशी झालेल्या दीर्घकाळ टिकलेली ओळख निर्माण झालेल्या आठवणींना उजाळा दिला. “तेव्हापासून आमची ओळख कायम टिकली आहे,” असे मोदींनी नमूद केले.
राज्याशी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक गहिऱ्या नात्याविषयी व्यक्त होताना पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या विस्तृत प्रवासामुळे त्यांना देशातील अफाट विविधता जवळून समजली आणि जाणीवही झाली. “माझ्या आयुष्यात तामिळ भाषा आणि तामिळ संस्कृतीबद्दल असलेले प्रेम याच अनुभवांतून निर्माण झाले आहे,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करताना, पंतप्रधानांनी तरुणांना भरपूर प्रवास करण्याचे आणि ते जिथे कुठे जातील तिथे तमिळ संस्कृती अभिमानाने सोबत घेऊन जाण्याचे आवाहन केले. देशाची एकात्मता मजबूत करण्यासाठी त्यांनी तरुणांना तमिळ कविता, कथा आणि परंपरा इतरांसोबत सामायिक करण्याचा तसेच अत्यंत भिन्न पार्श्वभूमी असलेल्या लोकांशी सक्रियपणे मैत्री करण्याचा सल्ला दिला. “आपल्या देशाची एकात्मता तुम्ही जोडत असलेल्या मैत्रीतून निर्माण होते,” असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.
देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या अभूतपूर्व संरचनात्मक बदलांचा तपशील देताना, पंतप्रधानांनी नवीन पिढीसाठी उपलब्ध असलेल्या संधींच्या प्रचंड विस्तारावर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट सांख्यिकीय पुरावे दिले आणि नमूद केले की देशातील विद्यापीठांची संख्या 2014 मधील 750 वरून वाढून आज 1,300 पेक्षा जास्त झाली आहे, तर महाविद्यालयांची संख्या 38,000 वरून वाढून 52,000 पेक्षा जास्त झाली आहे. यासोबतच अनेक नवीन आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी आणि एम्सची स्थापना झाली आहे. “आज देशातील शिक्षणाचे संपूर्ण चित्र बदलत आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
नवीन शिक्षण धोरणामुळे झालेल्या गुणात्मक सुधारणांवर भर देत, पंतप्रधानांनी देशांतर्गत संस्थांना जागतिक स्तरावर मिळत असलेल्या झपाट्याने वाढणाऱ्या मान्यतेचे कौतुक केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की क्युएस क्रमवारीमध्ये स्थान मिळवणाऱ्या भारतीय विद्यापीठांची संख्या 2015 मधील अवघ्या 14 वरून नाट्यमयरित्या वाढून ताज्या क्रमवारीत 52 झाली आहे, ज्याचा थेट परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर पर्याय उपलब्ध झाले आहेत. “अधिक संस्था, अधिक पर्याय आणि तुमच्यासाठी अधिक संधी,” असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.
तरुणांच्या वैविध्यपूर्ण आकांक्षांना संबोधित करताना पंतप्रधानांनी मान्य केले की बऱ्याच विद्यार्थ्यांना पारंपारिक नसलेल्या करिअरमध्ये, विशेषतः क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छा आहे. त्यांनी त्यांना आश्वासन दिले की खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग न राहता एक व्यवहार्य व्यवसाय मानला जावा, यासाठी देश सक्रियपणे नवीन क्रीडा पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे आणि उत्तम प्रशिक्षण व सहाय्य प्रदान करत आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिष्ठा आधीच वाढत आहे. “तरुण खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण आणि सहाय्य मिळत आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
अत्यंत महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय क्रीडा उद्दिष्टांची रूपरेषा सांगताना, पंतप्रधानांनी जाहीर केले की देश 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी आक्रमकपणे तयारी करत आहे आणि 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याच्या भव्य स्वप्नासह पुढे जात आहे. त्यांनी घोषित केले की आगामी काळात येणाऱ्या प्रचंड जागतिक क्रीडा स्पर्धांमुळे तरुणांकडे आता सर्वोच्च मंच, क्षमता आणि सरकारचे पूर्ण पाठबळ आहे. “संधी अमर्याद आहेत आणि मला खात्री आहे की तुमची पिढी क्रीडा जगतातही भारताला नवीन उंचीवर घेऊन जाईल,” असे मोदी यांनी आवर्जून सांगितले.
तरुण पिढीबद्दल विश्वास व्यक्त करताना पंतप्रधानांनी सांगितले की विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने आणि त्यांची स्वप्ने अनुभवल्याने देशाच्या उज्ज्वल भविष्यावरील त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यांनी तरुणांना आगामी काळाला आकार देणारे आणि त्याची व्याख्या करणारे सर्वोच्च नायक घोषित केले. “भारताचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असेल आणि त्या भविष्यातील सर्वात मोठे नायक तुम्ही आहात,” असे मोदी यांनी अधोरेखित केले.
त्यांच्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचे, आत्मविश्वासाचे आणि क्षमतेचे कौतुक केले. त्यांनी जमलेल्या तरुणांना काही मोठे, ऐतिहासिक राष्ट्रीय संकल्प करण्यासाठी आपल्यासोबत सामील होण्याचे आवाहन केले. “आज मला तुम्हा सर्वांसोबत काही मोठे संकल्प पुन्हा एकदा बोलून दाखवायचे आहेत,” असे मोदी यांनी नमूद केले.
अत्यंत परस्परसंवादी आणि उत्साही प्रतिज्ञेने आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी भव्य राष्ट्रीय उद्दिष्टांच्या मालिकेसाठी वचनबद्ध होण्यासाठी “आम्ही हे करूच!” अशा उत्स्फूर्त घोषणा देण्यास अथांग जनसमुदायास प्रोत्साहित केले. त्यांनी तरुणांना 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी, जागतिक स्तरावर पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्यासाठी, स्वयंपूर्ण जागतिक उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी, ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्यासाठी आणि चंद्रावर भारतीय व्यक्तीला पाठवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याचे आवाहन केले.
Golden Jubilee celebrations of Jaigopal Garodia Hindu Vidyalaya in Chennai… The energy of our youth inspires great faith in India’s future. https://t.co/FoyiqVrShY
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2026
आज का युवा ‘विकसित भारत’ के vision की ताकत बनना चाहता है।
विकसित भारत के लिए जो नए ideas चाहिए… जो नए solutions चाहिए… उनसे भारत ही नहीं, विश्व का भविष्य भी तय होगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
आज का युवा ‘विकसित भारत’ के vision की ताकत बनना चाहता है।
विकसित भारत के लिए जो नए ideas चाहिए… जो नए solutions चाहिए… उनसे भारत ही नहीं, विश्व का भविष्य भी तय होगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
आज भारत में जो infinite opportunities हैं… मैं चाहता हूं कि हर युवा अपने भविष्य को उसी बड़े canvas पर देखे।
Because, this is your time. This is your opportunity: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
मैं महान संत तिरुवल्लुवर जी को भी याद करुंगा।
उनकी शिक्षाएं आप सभी स्टूडेंट्स के लिए बहुत अहम हैं।
हाल ही में मुझे रूस के राष्ट्रपति पुतिन को तिरुक्कुरल का रूसी अनुवाद भेंट करने का अवसर मिला था: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
मैं महान संत तिरुवल्लुवर जी को भी याद करुंगा।
उनकी शिक्षाएं आप सभी स्टूडेंट्स के लिए बहुत अहम हैं।
हाल ही में मुझे रूस के राष्ट्रपति पुतिन को तिरुक्कुरल का रूसी अनुवाद भेंट करने का अवसर मिला था: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
भारत 2030 Commonwealth Games की मेजबानी की तैयारी कर रहा है।
हम 2036 Olympics की मेजबानी का सपना भी लेकर आगे बढ़ रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
***
शैलेश पाटील/माधुरी पांगे/तुषार पवार/विजयालक्ष्मी साळवी/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Golden Jubilee celebrations of Jaigopal Garodia Hindu Vidyalaya in Chennai... The energy of our youth inspires great faith in India's future. https://t.co/FoyiqVrShY
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2026
आज का युवा ‘विकसित भारत’ के vision की ताकत बनना चाहता है। विकसित भारत के लिए जो नए ideas चाहिए... जो नए solutions चाहिए... उनसे भारत ही नहीं, विश्व का भविष्य भी तय होगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
आज भारत में जो infinite opportunities हैं... मैं चाहता हूं कि हर युवा अपने भविष्य को उसी बड़े canvas पर देखे। Because, this is your time. This is your opportunity: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
@narendramodi तिरुक्कुरल उन सभी लोगों के लिए एक अद्भुत मार्गदर्शक है, जो जीवन भर कुछ नया सीखते रहना चाहते हैं। तिरुवल्लुवर जी अपने एक बहुत प्रसिद्ध कुरल में हमें सिखाते हैं कि कुछ सीखने के साथ ही उसे अपने जीवन में अपनाना भी आवश्यक है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
मैं महान संत तिरुवल्लुवर जी को भी याद करुंगा। उनकी शिक्षाएं आप सभी स्टूडेंट्स के लिए बहुत अहम हैं। हाल ही में मुझे रूस के राष्ट्रपति पुतिन को तिरुक्कुरल का रूसी अनुवाद भेंट करने का अवसर मिला था: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
भारत 2030 Commonwealth Games की मेजबानी की तैयारी कर रहा है। हम 2036 Olympics की मेजबानी का सपना भी लेकर आगे बढ़ रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026