Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक प्रेरणादायी द्रष्टे व्यक्तिमत्व, उत्कृष्ट शास्त्रज्ञ, मार्गदर्शक आणि महान देशभक्त म्हणून स्मरणात राहतील, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

आपले लाडके माजी राष्ट्रपती, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. ते एक प्रेरणादायी द्रष्टे व्यक्तिमत्व, उत्कृष्ट शास्त्रज्ञ, मार्गदर्शक आणि महान देशभक्त म्हणून स्मरणात राहतील. राष्ट्रासाठी त्यांनी दिलेले समर्पण अनुकरणीय होते. त्यांचे विचार भारताच्या युवा वर्गाला विकसित आणि सामर्थ्यशील भारत घडवण्यासाठी योगदान देण्याकरता प्रेरणा देत आहेत.

***

शिल्पा पोफळे/तुषार पवार/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai