Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधील गीर जंगल सफारी


गेल्या अनेक वर्षांपासून आशियाई सिंहांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीच्या सामूहिक प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक

आशियाई सिंहांचा अधिवास म्हणून परिचित असलेल्या गुजरातमधील गीर जंगलाची सफर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून आशियाई सिंहांच्या संख्येत सातत्याने वाढ सुनिश्चित करणाऱ्या सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

एक्स या समाजमाध्यमावरील त्यांच्या विविध पोस्ट:

“आज सकाळी, #WorldWildlifeDay निमित्त, मी गीरमध्ये सफारीला गेलो, जिथे राजेशाही आशियाई सिंहांचा अधिवास आहे हे आपण सर्व जाणतो. गीरमध्ये आल्याने मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना सामूहिकपणे केलेल्या कामाच्या अनेक आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. गेल्या अनेक वर्षांत, सामूहिक प्रयत्नांमुळे आशियाई सिंहांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे सुनिश्चित झाले आहे. आशियाई सिंहांचे अधिवास जपण्यात आदिवासी समुदाय आणि आसपासच्या भागातील महिलांची भूमिका तितकीच प्रशंसनीय आहे.”

“ही आहेत गीरमधील आणखी काही क्षणचित्रे. भविष्यात तुम्हीही गीर ला भेट द्यावी असे मी तुम्हाला आवाहन करतो.”

“गीर मधील सिंह आणि सिंहीणी! आज सकाळी काही छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न केला.”