Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये रिअल-टाइम सांकेतिक भाषेतील भाषांतर उपलब्धतेसह एआय-आधारित सुलभतेवर टाकला प्रकाश


नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेला संबोधित करताना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सुलभता आणि समावेशासाठी भारताची अढळ वचनबद्धता अधोरेखित केली.

त्यांच्या भाषणादरम्यान, एआय तंत्रज्ञानाद्वारे सांकेतिक भाषेतील रिअल-टाइम भाषांतर उपलब्ध करण्यात आले, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या पूर्ण सहभागाची  सुनिश्चिती  झाली. तंत्रज्ञानाच्या वापरातून माणसांमधील दरी कमी करत प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी भारत नवोन्मेषाला सतत चालना देत राहील, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

 पंतप्रधान X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हणाले:

“एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतील माझ्या भाषणात एआयच्या मदतीने सांकेतिक भाषेत रिअल-टाइम अनुवाद समाविष्ट करण्यात आला होता. यातून एआयच्या संदर्भात सुलभता आणि सर्वसमावेशकतेबाबत आमची वचनबद्धता स्पष्ट होते. दिव्यांग व्यक्तींसाठी तंत्रज्ञान आणि सार्वजनिक चर्चा  सुलभ व्हावेत यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.”

सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai