Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतच्या युवराजांसमवेत साधला संवाद


नवी दिल्ली,3 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

या संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी भारत, कुवेतचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनाचा निषेध करत असल्याचे स्पष्ट केले आणि या कठीण काळात भारत कुवेतच्या जनतेसोबत असल्याचे सांगितले.

दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य  पुनर्स्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचे महत्त्व अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी कुवेतमधील भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कुवेती नेतृत्वाकडून मिळत असलेल्या निरंतर पाठिंब्याची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;

“कुवेतचे युवराज महामहीम शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी फलदायी दूरध्वनी चर्चा झाली. कुवेतचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनांचा भारत निषेध करतो आणि या कठीण काळात त्यांच्या जनतेसोबत उभा आहे. 

प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचे महत्त्व आम्ही अधोरेखित केले. कुवेतमधील भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कुवेती नेतृत्वाच्या निरंतर पाठिंब्याची प्रशंसा केली.”

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai