Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएक्सटी शिखर परिषदेतील आपल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएक्सटी शिखर परिषदेतील आपल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीव्ही नेटवर्कच्या एनएक्सटी शिखर परिषदेतील आपल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या सध्याच्या प्रयत्नांमधील समांतरता अधोरेखित करत  मोदी म्हणाले की ज्याप्रमाणे 1930 च्या मोर्चाने देशाला स्वातंत्र्यासाठी  एकजूट केले, त्याचप्रमाणे सध्याचे “विकसित  भारत” अभियान हे 140 कोटी भारतीयांचे सामूहिक ध्येय आहे.

एक्स वरील पोस्टच्या मालिकेत, मोदी म्हणाले:

 “कधीकाळी भारतात जे कार्य अशक्यप्राय मानले जात होते , आजचा भारत ते साकार करून दाखवत आहे. ”

“आज युद्धामुळे जे जागतिक संकट उद्भवले आहे त्याला तोंड देण्यासाठी भारत  कोणतीही कसर सोडत नाही.”

“गेल्या एका दशकात आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे, माओवादी दहशतवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, एकेकाळी भीतीच्या सावटाखाली नाईलाजाने जगत असलेले भाग आता विकासाची नवी ऊर्जा अनुभवत आहेत.”

***

नेहा कुलकर्णी / सुषमा काणे

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai