Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारच्या अमीरांशी केली चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली आणि प्रादेशिक सुरक्षेशी संबंधित चिंतांवर चर्चा केली.

पंतप्रधानांनी शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना तसेच कतारच्या जनतेला ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी या चर्चेदरम्यान कतारसोबत भारताची एकजूट पुन्हा अधोरेखित केली आणि या क्षेत्रातील ऊर्जा पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. पंतप्रधान मोदी यांनी कतारमधील भारतीय समुदायाची घेतली जात असलेली काळजी आणि सहयोगासाठी कृतज्ञता व्यक्त केली; तसेच या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य नांदावे, अशी आशा व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी ‘होमुर्झच्या सामुद्रधुनीमधून सुरक्षित आणि मुक्त नौवहनाच्या आपल्या सामायिक भूमिकेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

“माझे बंधू, कतारचे अमीर महामहिम शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना तसेच कतारच्या जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या.

आम्ही कतारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि या क्षेत्रातील ऊर्जा पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो, या गोष्टीचा पुनरुच्चार केला.

भारतीय समुदायाची घेतली जात असलेली काळजी आणि सहयोगासाठी कृतज्ञता व्यक्त केली; तसेच या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य नांदावे, अशी आशा व्यक्त केली.

आम्ही ‘होमुर्झच्या सामुद्रधूनी’ मधून सुरक्षित आणि मुक्त नौवहनाच्या बाजूने ठामपणे उभे आहोत.”

https://tinyurl.com/4eat5wu9

PM India

***

NehaKulkarni / ShraddhaMukhedkar / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai