पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या साणंद येथील ‘केन्स टेक्नॉलॉजी’च्या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याची काही क्षणचित्रे सामायिक केली. या उद्घाटनासह सदर प्रकल्पात उत्पादनास प्रारंभ झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी ‘मायक्रॉन’ प्रकल्पातील उत्पादनाच्या सुरुवातीसाठी आपण साणंद येथे उपस्थित होतो आणि बरोबर एका महिन्यानंतर ‘केन्स’च्या या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आपण पुन्हा येथे आलो आहोत, याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रगतीला प्राप्त झालेल्या गतीवर विशेष भर दिला. “हा केवळ एक योगायोग नाही, तर भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था ज्या वेगाने विकसित होत आहे, त्याचा हा एक पुरावा आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
‘X’ वरील एका पोस्ट मालिकेत मोदी म्हणाले:
“भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेसाठी हा खरोखरच एक अभिमानाचा क्षण आहे की गुजरातच्या साणंद येथे ‘केन्स सेमीकॉन ओसॅट’ सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे भविष्यवेधी तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात एक अग्रणी म्हणून उदयास येण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ मिळेल.”
It is indeed a proud moment for India’s Semiconductor ecosystem that the Kaynes Semicon OSAT facility has been inaugurated in Sanand, Gujarat. This will boost India’s efforts of emerging as a leader in futuristic technologies and innovation. pic.twitter.com/Soz8BXPWaa
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2026
‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ला चालना
A boost to ‘Make in India’ and ‘Make for the World.’ pic.twitter.com/DfnsuluNZr
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2026
“ भारताचा सेमीकंडक्टर उद्योग विविध राज्यांमध्ये बहरत असून असंख्य तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करत आहे. या प्रयत्नांना आणखी व्यापक स्वरूप देण्यासाठी आम्ही आता ‘सेमीकंडक्टर मिशन 2.0’ वर काम करत आहोत.”
India’s semiconductor industry is thriving across different states, generating new opportunities for countless youngsters. We are now working on Semiconductor Mission 2.0 to add further scale to these efforts. pic.twitter.com/O900MQga19
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2026
“हे भारताचे ‘टेक-दशक’ (टेक एड) आहे!”
“तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर्स क्षेत्रातील आपले उपक्रम संपूर्ण जगाला लाभदायी ठरणार आहेत.”
This is India’s Techade!
Our initiatives in technology, AI, semiconductors are going to benefit the entire planet. pic.twitter.com/S0xjkpsYN9
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2026
***
माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com