Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पोखरण येथे 1998 मध्ये केलेल्या यशस्वी अणुचाचणीसाठी अथक परिश्रम आणि दृढ निश्चयाने कार्य केलेल्या वैज्ञानिकांच्या अभिमानास्पद कर्तृत्वाचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. या ऐतिहासिक क्षणाने भारताची वैज्ञानिक उत्कृष्टता आणि अढळ वचनबद्धता प्रतिबिंबित झाली, असे पंतप्रधान म्हणाले. 

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञान हा एक प्रमुख आधारस्तंभ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञान संपूर्ण देशभरात विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाला गती देत आहे, नवनवीन संधींचा विस्तार करत आहे आणि राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावत आहे. प्रतिभावंतांना सक्षम करणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्राचा विकास आणि लोकांच्या आकांक्षांना मूर्त रुप देणाऱ्या उपाययोजना निर्माण करणे याकडे सातत्याने लक्ष दिले जात आहे, यावर त्यांनी भर दिला.

त्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की 1998 मध्ये याच दिवशी पोखरण येथे केलेल्या अणुचाचणीने जगाला भारताकडे असलेल्या अभूतपूर्व क्षमतांचे दर्शन झाले. राष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान यांचे खऱ्या अर्थाने शिल्पकार असलेल्या वैज्ञानिकांचे  त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले. 

एक संस्कृत सुभाषित सामायिक करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की अग्नी ही  स्वर्गातील  सर्वोच्च शक्ती असून पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे.  ही अग्नितत्त्वाची ज्वलंत शक्ती पदार्थातील अतिसूक्ष्म कणांमध्ये दडलेली अपरंपार ऊर्जा जागृत करते आणि संपूर्ण सृष्टीत ऊर्जा आणि  गतीचा प्रसार घडवून आणते.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट्स मध्ये लिहिले आहे.

“राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा. 1998 मध्ये पोखरण मध्ये आपल्या वैज्ञानिकांचे अथक परिश्रम आणि दृढ निष्ठेच्या बळावर केलेल्या यशस्वी अणू चाचणीचे आपण आज मोठ्या अभिमानाने स्मरण करत आहोत.  या ऐतिहासिक क्षणाने भारताची वैज्ञानिक उत्कृष्टता आणि अढळ वचनबद्धता प्रतिबिंबित झाली.

आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी तंत्रज्ञान हा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. तंत्रज्ञान संपूर्ण देशभरात विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाला गती देत आहे, नवनवीन संधींचा विस्तार करत आहे आणि राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावत आहे. प्रतिभावंतांना सक्षम करणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्राचा विकास आणि लोकांच्या आकांक्षांना मूर्त रुप देणाऱ्या उपाययोजना निर्माण करणे याकडे सातत्याने लक्ष दिले जात आहे.

“1998 मध्ये याच दिवशी पोखरणमध्ये झालेल्या अणुचाचण्यांनी जगाला भारताच्या अद्भुत क्षमतांची ओळख करून दिली. आपले शास्त्रज्ञ हेच राष्ट्राच्या अभिमानाचे आणि आत्मसन्मानाचे खरे शिल्पकार आहेत.

अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम्।

अपां रेतांसि जिन्वति॥”

अग्नी ही  स्वर्गातील  सर्वोच्च शक्ती असून पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे.  ही अग्नितत्त्वाची ज्वलंत शक्ती पदार्थातील अतिसूक्ष्म कणांमध्ये दडलेली अपरंपार ऊर्जा जागृत करते आणि संपूर्ण सृष्टीत ऊर्जा आणि  गतीचा प्रसार घडवून आणते.

***

NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai