पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 18 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर यांच्यासोबत ओस्लो इथे द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि नॉर्वे यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून, पंतप्रधान स्टोर यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचे ओस्लो विमानतळावर आगमन झाल्यावर अत्यंत उत्साहाने स्वागत केले.
दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, भारत-युरोपीय मुक्त व्यापार संघटनेमधील व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराचा पाठपुरावा, हवामान विषयक उपाययोजना तसेच, ऊर्जा संक्रमण, नील अर्थव्यवस्था आणि महासागरीय प्रशासन, संशोधन आणि उच्च शिक्षण, आर्क्टिक आणि ध्रुवीय क्षेत्रातील सहकार्य, अंतराळ तसेच परस्पर देशांमधील प्रतिभान मनुष्यबळाची ये-जा या यांसह भारत आणि नॉर्वे मधील संबंधांच्या सर्व पैलूंचा व्यापक आढावा घेतला. शाश्वतता आणि हरित विकासाप्रती असलेली परस्पर सामायिक वचनबद्धताही दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केली. परस्परा देशांमधील संबंध हरित धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
दोन्ही देशांतील परस्पर आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारीचा विस्तार करण्यासाठी प्रचंड वाव असल्यावरही दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. नॉर्वेच्या कंपन्यांनी भारतातील गुंतवणूक वाढवल्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले. भारत आणि नॉर्वे मधील सध्याचे व्यापार मूल्य 2030 पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्टही दोन्ही नेत्यांनी मांडले. यासोबतच भारत-युरोपीय मुक्त व्यापार संघटनेमधील व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारांतर्गत 100 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची वचनबद्धता पूर्णत्वाला नेण्यासाठी तसेच भारतात 10 लाख रोजगारांच्या निर्मितीसाठी विविध क्षेत्रांमध्ये बहुआयामी भागीदारी प्रस्थापित करण्याकरता त्यांनी उद्योग-व्यवसाय क्षेत्राच्या प्रतिनिधींना प्रोत्साहित केले.
सागरी परिसंस्थेचे रक्षण, जहाजबांधणी, हरित सागरी मालवाहतुक, बोगद्या़ची निर्मिती आणि पायाभूत सुविधा, अंतराळ क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, खलाशांचे प्रशिक्षण, मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन यांसह नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्राअंतर्गतचे परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचे उद्दिष्टही दोन्ही नेत्यांनी आपापल्या पथकांसमोर ठेवले. संयुक्त राष्ट्र सागरी कायदा करारांतर्गतच्या तत्त्वांप्रती आपापली वचनबद्धताही त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. भारत-प्रशांत महासागरीय उपक्रमात (IPOI – Indo-Pacific Oceans Initiative) नॉर्वे सहभागी होत असल्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले. जून 2026 मध्ये फ्रान्स इथे आयोजित केल्या जाणार असलेल्या भारत इनोव्हेट्स 2026 या उपक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेला दिले. यासोबतच दोन्ही देशांदरम्यान स्टार्टअप नवोन्मेष केंद्र स्थापित करण्याचा तसेच हरित नवोन्मेष हॅकाथॉन सुरू करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
पर्यावरण आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर भर देत, दोन्ही नेत्यांनी कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज (CCUS) आणि सागरी पवन ऊर्जा यासारख्या अत्याधुनिक व विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये अधिक भागीदारी करण्याचे आवाहन केले. तसेच, भारतातील स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांमध्ये नॉर्वेने मोठी गुंतवणूक करावी, असे आवाहन करण्यात आले.
आर्क्टिक प्रदेशातील पर्यावरणपूरक पद्धतींचे पालन करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, दोन्ही नेत्यांनी तिथले ध्रुवीय संशोधन आणि लॉजिस्टिक्स अधिक बळकट करण्यावर सहमती दर्शवली. त्यांनी अक्षय ऊर्जा, महासागर, हवामान, आरोग्य, महत्त्वपूर्ण खनिजे, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांसह संशोधन आणि नवोपक्रमातील संयुक्त कामावर भर दिला. उच्च शिक्षणाच्या संदर्भात, संयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू करणे, एकमेकांच्या शैक्षणिक पात्रता व पदव्यांना मान्यता देणे, आणि विद्यार्थी व प्राध्यापकांची ये-जा यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी शक्यता आजमावण्यावर सहमती झाली.
याशिवाय, त्यांनी बहुपक्षीय मंचांवरील सहकार्याबाबत चर्चा केली आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रमुख प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारित संरचनेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, यासाठी नॉर्वेच्या पाठिंब्याचा नॉर्वेच्या पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि या समस्येचा बिमोड करण्यासाठी जागतिक स्तरावर संघटित पावले उचलण्याचे आवाहन केले.
संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणि संरक्षण उद्योगांमधील भागीदारीतील संधींची त्यांनी दखल घेतली. ‘डिजिटल पब्लिक गुड्स’च्या (डीपीजी) बाबतीत तिसऱ्या देशांसोबत सहकार्याच्या शक्यता तपासण्यावर त्यांनी सहमती दर्शवली, तसेच डिजिटल संक्रमणाला गती देण्यासाठी एका ‘संयुक्त कार्यगटाची’ स्थापना करण्याचे निर्देश संबंधित मंत्रालयांना दिले.
मनापासून केलेल्या आदरातिथ्याबद्दल नॉर्वेचे पंतप्रधान स्टोअर आणि तेथील जनतेचे पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. त्यांनी पंतप्रधान स्टोर यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय बैठकांचा हा वेग असाच कायम राखण्यावर दोन्ही नेत्यांनी एकमत दर्शवले.
* * *
सुषमा काणे/निलिमा चितळे/तुषार पवार/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Held fruitful talks with PM Jonas Gahr Støre in Oslo. One of the key highlights was the upgrading of our bilateral partnership to a Green Strategic Partnership, which will deepen synergy in clean energy, sustainable growth, the blue economy, green shipping and more. We also… pic.twitter.com/yIlqNWNVcp
— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2026
Trade is key to the India-Norway friendship. The recently signed India-EU Free Trade Agreement offers immense opportunities to boost economic and investment linkages. pic.twitter.com/Prp9ppCeKO
— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2026
These outcomes will add new strength to a partnership rooted in trust, sustainability and shared aspirations.
— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2026
Key outcomes include the Green Strategic Partnership and deeper cooperation in space, digital technologies, health, capacity building and other future-oriented sectors. https://t.co/FxBJX8aj37
PM @narendramodi held productive talks with PM @jonasgahrstore in Oslo, during which India and Norway elevated their ties to a Green Strategic Partnership.
— PMO India (@PMOIndia) May 18, 2026
The discussions focused on expanding cooperation in clean energy, blue economy, sustainable growth, green shipping,… pic.twitter.com/h5CyVe3Dbu