Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या 6 वर्षांच्या वाटचालीचा केला गौरव, लाभार्थ्यांनाही दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 1 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या 6 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव केला आणि देशभरातील फेरीवाल्यांचे जीवन बदलण्यात या योजनेने बजावलेली भूमिका अधोरेखित केली.

या योजनेच्या माध्यमातून असंख्य फेरीवाल्यांना विना तारण कर्ज, वित्तीय सर्वसमावेशकता आणि प्रगतीची नवीन संधी मिळवून दिली असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे. प्रधानमंत्री स्वनिधी ही विश्वासार्हता, सन्मान आणि सक्षमीकरणाच्या मूल्यांशी खोलवर जोडलेली योजना असल्याचेही पंतप्रधांनी म्हटले आहे.

या निमीत्ताने त्यांनी सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.  या लाभार्थ्यांचा दृढनिश्चय  आणि उद्यमशीलतेचेही पंतप्रधानांनी कौतुक केले आहे, त्यांचे असे प्रयत्नच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश :

आज आपण #6YearsofPMSVANidhi साजरी करत आहोत. या योजनेने विना तारण कर्ज, वित्तीय सर्वसमावेशकता आणि प्रगतीची नवीन संधींची सुनिश्चित करत असंख्य फेरीवाल्यांचे जीवन बदलून टाकले आहे. विश्वासार्हता, सन्मान आणि सक्षमीकरण हाच या योजनेचा अर्थ आहे. सर्व लाभार्थ्यांना माझ्या शुभेच्छा, त्यांचा दृढनिश्चय आणि उद्यमशीलता आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहेत.

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai