Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर सामायिक केला युवा सक्षमीकरण आणि प्रधान मंत्री विकसित भारत रोजगार योजनेविषयीचा लेख


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला  आहे.

असंख्य संधी उपलब्ध करून देत युवांचे सक्षमीकरण ही विकसित भारत घडविण्यासाठीची मूलभूत संकल्पना असल्याचे या लेखात अधोरेखित केले आहे. तसेच, प्रधान मंत्री विकसित भारत रोजगार योजना (पीएमव्हीबीआरवाय) मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि परिवर्तनाला चालना देईल, युवांना राष्ट्र बांधणीत सक्रिय सहभागासाठी प्रेरणा देण्यात महत्त्वाचा उपक्रम ठरेल, असे या लेखात नमूद केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यम X वरील संदेशात म्हटले आहे,

“असंख्य संधी उपलब्ध करून देत युवांना सक्षम करणे ही विकसित भारत घडविण्यासाठीची मूलभूत संकल्पना आहे. पीएमव्हीबीआरवाय  मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि परिवर्तनाला चालना देण्यासाठी सज्ज आहे. ही योजना तरुणांना राष्ट्र बांधणीत सक्रिय सहभागी होण्यासाठी सक्षम करणारा महत्त्वाचा उपक्रमही ठरेल!

केंद्रीय मंत्री डॉ. @mansukhmandviya यांचा लेख आवर्जून वाचा.”

***

निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai