Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जन्मदिनी, त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला दिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जन्मदिनी, त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला दिली भेट


 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवशी त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला भेट देणे हा आपण आपला बहुमान मानत असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पहाडपूर हे राष्ट्रपतींचे स्वतःचे गाव असून त्यांनी केलेले कार्य खरोखरच अत्यंत प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश,

राष्ट्रपतीच्या सोबत त्यांच्या जन्मदिनी  ओदिशातील पहाडपूर गावाला भेट देण्याचा बहुमान मला लाभला. हे त्यांचे गाव असून त्यांनी केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.

त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना.

@rashtrapatibhvn  

***

सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]