पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 10 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्न क्रिकेट मैदानावर आयोजित भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा संबंधांना समर्पित कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि व्हिक्टोरियाच्या प्रीमियर, जॅसिंटा ॲलन देखील उपस्थित होत्या. याशिवाय या कार्यक्रमाला स्टीव्ह वॉ आणि लिसा स्थळेकर यांच्यासह ऑस्टेलियातले इतर दिग्गज खेळाडू देखील उपस्थित होते. या भेटीमुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमधील आधारस्तंभ असलेले क्रीडाक्षेत्र, सांस्कृतिक आदानप्रदान आणि लोकांमधील संबंध यांचे महत्त्व अधोरेखित झाले.
या कार्यक्रमादरम्यान दोन्ही पंतप्रधानांनी भारत-ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्याचा पथदर्शी आराखडा प्रसिद्ध केला, यामुळे क्रीडा प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी, क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच क्रीडा उद्योग आणि गुंतवणूक या क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. याशिवाय याअंतर्गत भारत-ऑस्ट्रेलिया युवा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्याचे देखील उद्दिष्ट आहे. दोन्ही नेत्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रीडा क्षेत्रातील वाढत्या सहयोगाने स्वागत केले.
हा पथदर्शी आरखडा दोन्ही देशांमधील क्रीडा भागीदारी अधिक व्यापक करण्यास मदत करेल असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना एकमेकांच्या जवळ आणण्यातील खेळांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका अधोरेखित केली. महिला विश्वचषक जिंकल्याबद्दल त्यांनी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले. भारत 2030 मधील राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद भूषवणार असून ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन ऑलिंपिक्स 2032 चे आयोजन होत असल्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण दशकात एकत्रितपणे प्रवेश करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. या उपक्रमांमुळे क्रीडा आणि त्याक्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये निकट द्विपक्षीय सहकार्याच्या नैसर्गिक संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी कबड्डी, ऑस्ट्रेलियन फुटबॉल आणि क्रिकेटच्या प्रदर्शनीय सामन्यांमध्ये सहभागी झालेल्या युवा खेळाडूंशी संवाद साधला.
या दौऱ्यातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मजबूत क्रीडा संबंध आणि लोकांमधील वाढत्या संपर्काचे दर्शन घडले.
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Wonderful to visit the Melbourne Cricket Ground with PM Albanese. The passion for sport continues to bring the people of India and Australia closer.@AlboMP https://t.co/4agouUbx69
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2026
Sport is a key pillar of the India-Australia partnership, bringing our people closer through shared passion and mutual respect.
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2026
Delighted to visit the iconic Melbourne Cricket Ground (MCG) with PM Albanese.
More sporting exchanges, youth engagement and collaboration can… pic.twitter.com/o90MSPIswm
Some more glimpses from the MCG today.@AlboMP@MCG pic.twitter.com/nkvM842JpH
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2026