पीएम्इंडिया
भारतीय परराष्ट्र सेवेच्या(आयएफएस) 2025 च्या तुकडीच्या अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी आज सेवा तीर्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या गटामध्ये देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 50 आयएफएस अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता.
संवादादरम्यान, पंतप्रधानांनी तरुण मुत्सद्यांना त्यांच्या नियुक्तीच्या देशांमध्ये तळागाळातील पातळीवर मजबूत संपर्क निर्माण करण्याचे आणि तेथील स्थानिक समुदायांशी भारताचे नाते अधिक दृढ करण्याचे आवाहन केले. भारतीय दूतावासांनी केवळ सरकारे आणि संस्थांशीच नव्हे तर समुदाय पातळीवरील लोकांशीही अर्थपूर्ण संबंध जपले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक मुत्सद्दी वर्तुळाच्या पलीकडे जाऊन आपल्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आणि लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले. भारताचा जागतिक सहभाग अधिक मजबूत करण्यासाठी, भारताची नागरी ताकद तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि प्रभावी संवादासोबत जोडण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांना प्रोत्साहित केले.
पंतप्रधानांनी अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांना भारताच्या जगासोबतच्या आर्थिक सहभागासाठी ‘उत्प्रेरक‘ म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी भारतीय दूतावासांची डिजिटल उपस्थिती बळकट करण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला. वेबसाईट हे बहुधा पहिले प्रवेशद्वार असते ज्याद्वारे लोक एखाद्या संस्थेशी संवाद साधतात, असे ते म्हणाले. त्यांनी दूतावास आणि इतर सेवांचे वितरण अधिक सुलभ, प्रतिसादक्षम आणि नागरिक-केंद्री बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन केले.
भारताचे नागरी , सांस्कृतिक आणि भौगोलिक सामर्थ्य जगासमोर मांडून भारताला अधिक आकर्षक जागतिक पर्यटन स्थळ बनवण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांना केले. जगभरातील तरुण पिढीमध्ये भारताविषयी अधिक उत्सुकता निर्माण करण्यासाठी “भारत को जानिये” प्रश्नमंजुषेचा वापर करण्याची सूचना त्यांनी केली, तसेच अशा उपक्रमांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी एआय आणि गेमिंगचा वापर करण्यास प्रोत्साहित केले.
अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या प्रशिक्षणाचे आणि ‘भारत दर्शन‘चे अनुभव सामायिक केले. जगासोबत भारताचे असलेले नागरी आणि सांस्कृतिक संबंध समजून घेण्याच्या महत्त्वावरही त्यांनी आपली मते व्यक्त केली.
***
सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
Interacted with the Officer Trainees of the 2025 Batch of the Indian Foreign Service.
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2026
Called upon our young diplomats to:
Take diplomacy beyond traditional diplomatic circles and engage meaningfully with local communities and the diaspora.
Become catalysts for India’s economic… pic.twitter.com/g24XJ4iOxf