Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका संस्कृत सुभाषितातून आदर, विश्वास आणि प्रभावी नेतृत्वाचा पाया म्हणून उदात्त चारित्र्याचे महत्त्व विशद केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका संस्कृत सुभाषितातून आदर, विश्वास आणि प्रभावी नेतृत्वाचा पाया म्हणून उदात्त चारित्र्याचे महत्त्व विशद केले. 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून उत्तम चारित्र्य असलेली व्यक्ती समाजात आदर मिळवते आणि प्रत्येक जबाबदारी पेलण्यास पात्र मानली जाते, असे या सुभाषितात म्हटले आहे.

पंतप्रधानाने एक समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे:

“शीलवान् पूजितो लोके शीलवान् साधुसम्मतः।

शीलवान् सर्वकर्मार्हः शीलवान् प्रियदर्शनः॥”

उत्तम चारित्र्य असलेली व्यक्ती समाजात आदर आणि गुणवान लोकांची प्रतिष्ठा प्राप्त करते. सचोटी, नम्रता आणि शिस्तबद्ध आचरणामुळे अशी व्यक्ती कोणत्याही जबाबदारीसाठी पात्र मानली जाते. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रशंसनीय, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असते. वस्तुतः, उत्तम चारित्र्य हाच चिरस्थायी यश, प्रभावी नेतृत्व आणि दृढ विश्वासाचा खरा पाया आहे.

***

NehaKulkarni / Bhakti Sontakke. / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai