पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कार्यकाळात भारताचा विकास आणि देशातील नागरिकांच्या सक्षमीकरणावर कशाप्रकारे लक्ष केंद्रित करण्यात आले, हे अधोरेखित केले आहे.
पायाभूत सेवांचा विकास आणि जनकल्याणापासून तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भारताच्या जागतिक प्रतिष्ठेपर्यंत, या वर्षांमध्ये व्यापक परिवर्तन अनुभवायला मिळाले आहे, यातूनच भारतात टप्प्या -टप्प्याने होणाऱ्या प्रगतीपासून महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासापर्यंतची वाटचाल दिसून येते असे नायडू यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या नेतृत्त्वकाळाने भारताचा विकास आणि त्यातील लोकांच्या सक्षमीकरणावर भर दिल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लिहिले आहे. पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांपासून तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भारताच्या जागतिक प्रतिष्ठेपर्यंत, या वर्षांमध्ये व्यापक परिवर्तन घडून आले आहे.
भारताच्या क्रमाक्रमाने होणाऱ्या प्रगतीपासून ते महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासाने भरलेल्या वाटचालीपर्यंतच्या प्रवासावर आधारित हा लेख आवर्जून वाचा.
PM @narendramodi’s 25 years in leadership have focused on India’s development and the empowerment of its people, writes Andhra Pradesh CM Shri @ncbn. From infrastructure and welfare to technology, innovation and India’s global stature, these years have seen a broad transformation.
Do read this article on India’s journey from incrementalism to ambition and confidence.
https://t.co/oeMXuMBEz5
— PMO India (@PMOIndia) October 7, 2026
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
PM @narendramodi's 25 years in leadership have focused on India's development and the empowerment of its people, writes Andhra Pradesh CM Shri @ncbn. From infrastructure and welfare to technology, innovation and India's global stature, these years have seen a broad transformation. Do read this article on India's journey from incrementalism to ambition and confidence. https://t.co/oeMXuMBEz5
— PMO India (@PMOIndia) October 7, 2026