Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेहरानमधल्या भाई गंगासिंह सभा गुरुद्वारात प्रार्थन केली आणि जनसमुदायाला संबोधित केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेहरानमध्ये आज संध्याकाळी पोहोचताच भाई गंगा सिंह सभा गुरुद्वाराला भेट देऊन गुरु ग्रंथ साहिबा समोर प्रार्थना केली. यावेळी त्यांना सरोपा आणि तलवार भेट देण्यात आली.

यानंतर तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना नव्या पिढीसाठी आपली समृद्ध परंपरा आणि संस्कृती जतन करुन ठेवल्याबद्दल पंतप्रधानांनी शिख समुदायाची प्रशंसा केली. वसुधैव कुटुंबकम् म्हणजे संपूर्ण विश्व, हे एक कुटुंब आहे या वचनावर भारतीयांचा विश्वास आहे त्यामुळे ते सर्वांमध्ये सहज मिसळतात असे पंतप्रधान म्हणाले.

गुरु गोविंदसिंह यांची 350 वी जयंती भारत आणि जगाच्या इतर भागातही साजरी केली जाईल. युवा पिढीमध्ये गुरुंच्या हौतात्म्याविषयी आणि पवित्र गुरु ग्रंथ साहिबातल्या संदेशाविषयी मोठी जागृती याद्वारे निर्माण होईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

N. Chitale/B.Gokhale