Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी साधला संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांचे आज दूरध्वनीवरून संभाषण झाले.

उभय नेत्यांनी भारत-नेपाळ द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतला आणि पंतप्रधान प्रचंड यांच्या 31 मे ते 3 जून 2023 या नुकत्याच झालेल्या भारत भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा पाठपुरावा केला, जेणेकरून द्विपक्षीय भागीदारी पुढे नेणे आणि दोन्ही देशांमधील मैत्रीचे सखोल बंध अधिक दृढ करणे शक्य होईल.

जवळचा आणि मैत्रीपूर्ण शेजारी असलेला नेपाळ हा भारताच्या नेबरहुड फर्स्टधोरणाचा प्रमुख भागीदार आहे.

या दूरध्वनी संभाषणामुळे दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय देवाणघेवाणीची परंपरा कायम राहिली आहे.

***

R.Aghor/G.Deoda/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai