पीएम्इंडिया
नवी दिल्ली,30 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये, पुरुषांच्या 100 मीटर T47 प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या दिलीप महादू गावित याचे अभिनंदन केले आहे.
दिलीप महादू गावित याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम प्रस्थापित करत,लक्षणीय वेळ नोंदवत या हंगामातील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे असा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या संदेशांत केला.
त्याचा वेग, दृढनिश्चय आणि समर्पणवृत्ती याच्या जोरावर गावित याने देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे असे सांगत पंतप्रधानांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशांत मोदी म्हणतात :
“दिलीप महादू गावित याची अभूतपूर्व कामगिरी.
पुरुष गटातील 100 मीटर T47 शर्यतीत सर्वोत्कृष्ट वेळेसह सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, तसेच स्पर्धेतील नवीन विक्रम आणि या हंगामातील स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्याचा वेग, जिद्द आणि समर्पण यांनी आपल्या देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे. त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!”
#CWG2026
A phenomenal performance by Dilip Mahadu Gavit!
Congratulations to him on winning the Gold Medal in the Men’s 100m T47 event with a remarkable timing, setting a new Games Record and achieving his Season Best. His speed, determination and dedication have made our nation proud.…
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2026
सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com