पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील मेट्रो नेटवर्कचा लक्षणीय विस्तार अधोरेखित केला. त्यांनी नमूद केले की, 2014 मध्ये देशात केवळ पाच शहरांमध्ये 248 किमी लांबीचे मेट्रो मार्ग होते, जे आज 26 शहरांमध्ये सुमारे 1,200 किमी पर्यंत विस्तारलेले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, दररोज एक कोटीहून अधिक लोक मेट्रोने प्रवास करतात. या विस्तारामुळे वाहतूक कोंडीतला वेळ वाचतो, कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येतो, उत्पादकता वाढते आणि उत्तम संधी उपलब्ध होतात.
मोदी म्हणाले की, शहरी भारतासाठी सरकार अशाच प्रकारच्या बदलाच्या दिशेने काम करत आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले;
“मला तुम्हाला विचारायचे आहे …
जर भारतातील मेट्रो नेटवर्कचा विस्तार 2014 पूर्वीच्या गतीनेच सुरू राहिला असता, तर पुणे सारख्या शहरांना मेट्रो येण्यासाठी किती वाट पाहावी लागली असती?
वर्षे… नाही… कदाचित अनेक दशके!
आणि हे अजिबात स्वीकारार्ह नव्हते.
2014 मध्ये, भारतात केवळ 5 शहरांमध्ये 248 किमी लांबीचे मेट्रो मार्ग होते.
आज, आपल्याकडे 26 शहरांमध्ये सुमारे 1,200 किमी लांबीचे मेट्रो जाळे आहे.
दररोज 1 कोटीहून अधिक लोक मेट्रोने प्रवास करतात.
याचा प्रभाव केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाही.
याचा अर्थ असा की, वाहतूक कोंडीत वाया जाणारा वेळ वाचतो, कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येतो, उत्पादकता वाढते आणि उत्तम संधी उपलब्ध होतात.
शहरी भारतासाठी आम्ही याच परिवर्तनाच्या दिशेने काम करत आहोत!”
Let me ask you…
If India’s Metro network had continued expanding at the pace it did before 2014, how long would the wait be for cities like Pune to have a metro?
YEARS….no…DECADES perhaps.
And that was UNACCEPTABLE.
In 2014, India had just 248 km of Metro lines across 5 cities.
Today, we have nearly 1,200 km across 26 cities.
Over 1 crore people travel by Metro every day.
The impact goes beyond statistics or numbers.
It means less time in traffic, more family time, greater productivity and better opportunities.
This is the transformation we are working towards for urban India!
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2026
***
Nitin Fulluke / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Let me ask you… If India’s Metro network had continued expanding at the pace it did before 2014, how long would the wait be for cities like Pune to have a metro? YEARS….no…DECADES perhaps. And that was UNACCEPTABLE. In 2014, India had just 248 km of Metro lines across 5 cities. Today, we have nearly 1,200 km across 26 cities. Over 1 crore people travel by Metro every day. The impact goes beyond statistics or numbers. It means less time in traffic, more family time, greater productivity and better opportunities. This is the transformation we are working towards for urban India!
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2026