Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधे झालेले सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधे झालेले सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधे झालेले सामंजस्य करार


1) भारतीय सांस्कृतिक मंत्रालय आणि रशियाचे सांस्कृतिक मंत्रालय यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाणीसंदर्भात करार झाला. या करारावर भारतातर्फे राजदूत पंकज सरन यांनी, तर रशियातर्फे, रशियाचे संस्कृती मंत्री व्लादिमिर मेडिन्स्कायी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

2) तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामाविषयी एक सामान्य आराखडा करार, यावेळी करण्यात आला. या करारावर भारतातर्फे एन.पी.सी.आय.एल.चे अध्यक्ष सतीश कुमार शर्मा यांनी, तर रशियातर्फे रॉझॅटोम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲलेक्झी लिखाचेव यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

3) रोझपेटन्ट तज्ज्ञांना, भारतातील पारंपरिक ज्ञान क्षेत्रातील डिजिटल लायब्ररीत प्रवेश मिळावा, यादृष्टीने भारतीय विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि रशियातील, ‘बौद्धीक संपदाविषयक संघराज्य सेवा’ (रोझपेटन्ट) यांच्यात करार झाला. भारताच्या वतीने या करारावर राजदूत पंकज सरन यांनी आणि रशियाच्या वतीने रोझपेटन्टचे प्रमुख ग्रीगोरी आयलिव्ह यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

4) नागपूर-सिकंदराबाद दरम्यान जलद गती रेल्वेसेवा सुरु करण्याच्या कामाबाबत उभय देशांच्या रेल्वे विभागांमधे करार करण्यात आले. पंकज सरन यांनी भारतातर्फे आणि रशियन रेल्वेचे अध्यक्ष ओलेग बेलोसिरो यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

5) रशियातील अलरोझा ही संयुक्त रोखे कंपनी आणि भारतीय आभूषण आणि रत्ने निर्यात प्रोत्साहन परिषदेदरम्यान परस्पर सहकार्याविषयी सामंजस्य करार करण्यात आला. जवाहिरे आणि रत्ने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष प्रवीण पंड्या आणि अलरोझा कंपनीचे अध्यक्ष सेरगी इव्हानोव्ह यांच्यात हा करार झाला.

B.Gokhale/R.Aghor/D. Rane