पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयर्लंडचे पंतप्रधान एन्डा केनी यांना थॉमस ओल्डहॅम (1816-1878) आणि सर जॉर्ज अब्राहम ग्रिअर्सन (1851-1941) या दोन आयरिश अधिकाऱ्यांचं भारतातलं योगदान अधोरेखित करणारे राष्ट्रीय पुरातत्व विभागातल्या निवडक दस्तावेज आणि हस्तलिखितांच्या प्रती भेट दिल्या.
1816 मध्ये डब्लिनमध्ये जन्मलेले थॉमस ओल्डहॅम यांची 1850 मध्ये भारतात तत्कालीन बंगाल सरकारमध्ये भूगर्भ सर्वेक्षक म्हणून नियुक्ती झाली. 1851 च्या मार्चमध्ये त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि ते ज्या दिवशी कामावर रुजू झाले तो दिवस भारतात भूगर्भ सर्वेक्षण स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आयर्लंडचे सर जॉर्ज ए ग्रिअर्सन नागरी सेवेतले अधिकारी आणि भाषाशास्त्रज्ञ होते. वर्ष 1898 मध्ये त्यांनी पहिले भारतीय भाषिक सर्वेक्षण सुरू केले. हे सर्वेक्षण 1903-28 या कालावधीत प्रकाशित झाले. ग्रिअर्सन यांच्या सर्वेक्षणामुळे इंडो-आर्यन भाषांची शास्त्रीय पायावर आधारित वर्गीकरणाची तत्त्वं प्रथमच तयार झाली.
डब्लिनमधल्या ट्रिनिट्री महाविद्यालयात गणिताचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करणाऱ्या ग्रिअर्सन यांनी संस्कृत आणि हिंदीत पारितोषिक मिळवली. ऑक्टोबर 1873 मध्ये ते बंगालमध्ये गेले तिथे 1898 पर्यंत सरकारी सेवेबरोबरच त्यांनी भाषा संशोधन कार्यालाही स्वत:ला वाहून घेतलं होतं. बिहारी भाषेच्या सात बोलीभाषा आणि उपबोलींचे व्याकरण तसेच बिहारी शेतमजूरांची जीवनगाथा या विषयावरील त्यांचे लेखन महत्त्वपूर्ण मानले जाते.
1994 पासून हिंदीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या परदेशी विद्वानाला त्यांच्या सन्मानार्थ पुरस्कारानं गौरवण्यात येते. पंतप्रधानांनी आयर्लंडचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या ‘शामरॉक’चे काल्पनिक चित्र असलेली चांदी, संगमरवर आदींपासून खास तयार केलेली कलाकृती भेट दिली.
N. Chitale/S.Tupe
Presented reproductions of selected manuscripts & papers from the National Archives of India to Mr. @EndaKennyTD. pic.twitter.com/t9E18ia5pI
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2015
The selection is connected with Irish officials, Mr.Thomas Oldham & Sir George Abraham Grierson, recognising their contribution to India.
— NarendraModi(@narendramodi) September 23, 2015
Thomas Oldham was appointed geological surveyor in 1850. His joining day in 1851 is marked as foundation day of Geological Survey of India.
— NarendraModi(@narendramodi) September 23, 2015
Mr.Oldham conducted 1st systemic coal mapping of India & later initiated mapping of other minerals. He wrote a lot about fossils in India.
— NarendraModi(@narendramodi) September 23, 2015
Sir George A Grierson conducted the 1st linguistic survey of India, which was published over several years between 1903 to 1928.
— NarendraModi(@narendramodi) September 23, 2015
Grierson’s Linguistic Survey of India provided 1st scientifically based taxonomy of Indo-Aryan languages. pic.twitter.com/OdEqIkjeX8
— NarendraModi(@narendramodi) September 23, 2015
Also presented Mr.@EndaKennyTD a specially handcrafted piece of silver marble and roughly hewn sandstone rock. http://t.co/d2Bw6rJR59
— NarendraModi(@narendramodi) September 23, 2015