Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान मोदी यांनी या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक लघू चित्रफीतही सामायिक   केली आहे. 

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे :

“ समस्त देशवासीयांना गीता जयंतीनिमित्त अनंत शुभेच्छा. भारतीय संस्कृती,  अध्यात्म आणि परंपरांचा मार्गदर्शक असणाऱ्या या दिव्य ग्रंथाच्या उद्गम दिनाच्या रुपात साजरा केला जाणारा हा पावन उत्सव प्रत्येकाला कर्मयोगाचा पथ दाखवणारा ठरो. जय श्री कृष्ण!”

***

NM/S.Mukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai