Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान यांची नाताळच्या सकाळच्या सेवेला उपस्थिती

पंतप्रधान यांची नाताळच्या सकाळच्या सेवेला उपस्थिती


नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ‘द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन’ येथे झालेल्या नाताळ सकाळच्या सेवेला उपस्थिती लावली. “या सेवेतून प्रेम, शांती आणि करुणेचा कालातीत संदेश प्रतिबिंबित झाला. नाताळची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि सद्भावना निर्माण करो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:

“दिल्लीतील द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे नाताळ सकाळच्या सेवेला उपस्थित राहिलो. या सेवेने प्रेम, शांती आणि करुणेचा कालातीत संदेश प्रतिबिंबित केला. नाताळची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि सद्भावना निर्माण करो.”

 

“द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे झालेल्या ख्रिसमस सकाळच्या सेवेची एक झलक”

 

नाताळ नवीन आशा, बंधुता आणि दयाळूपणाची सामायिक वचनबद्धता घेऊन येवो.

“द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमधील नाताळ सकाळच्या सेवेतील काही ठळक बाबी येथे आहेत.”

 

* * *

शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai