Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान सिक्किम आणि आसामला भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिक्किम आणि आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज दुपारी गंगटोकला पोहोचल्यानंतर ते ऑर्किड प्रदर्शन आणि हंगामी फुलांच्या प्रदर्शनाला भेट देतील.

पंतप्रधान आज गंगटोक येथे शाश्वत विकास, सेंद्रिय शेती आणि इको-पर्यटनावरील राज्य कृषीमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ते दोन तासांहून अधिक काळ उपस्थित राहतील आणि संबोधित देखील करतील.

पंतप्रधान उद्या सकाळी गंगटोक येथे सेंद्रिय उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट देतील आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरऱ्यांशी संवाद साधतील.

त्यानंतर ते आसामला रवाना होतील.

आय आय आय टी गुवाहाटीच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन पंतप्रधान करतील आणि आय आय टी, एन आय टी आणि ईशान्येच्या केंद्रीय विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना संबोधित करतील.

S.Kane/S.Tupe/M.Desai