पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 एप्रिल 2026 रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता त्यांच्या हस्ते मंडया जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन होईल.
या भेटीदरम्यान पंतप्रधान माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा’जी यांच्यासह “सौंदर्य लहरी आणि शिव महिमा स्तोत्रम” नामक पुस्तकाचे संयुक्तपणे अनावरण देखील करतील.
श्री गुरु भैरवैक्य मंदिर हे महान सिद्धपुरुष, श्री आदिचुंचनगिरी महासंस्थान मठाचे 71 वे धर्मगुरु श्री श्री डॉ. बालगंगाधरनाथ महास्वामीजी यांना समर्पित स्मारक आहे. पारंपरिक द्रविडी स्थापत्य शैलीत बांधलेले हे मंदिर दिवंगत सिध्दपुरुषाचे जीवन आणि वारसा यांच्याप्रती आदरांजली स्वरुपात उभे आहे. केवळ एक पूजनीय स्थान म्हणूनच नव्हे तर भावी पिढ्यांसाठी प्रेरणा स्रोताच्या रुपात या मंदिराची संकल्पना केली आहे.
श्री श्री डॉ. बालगंगाधरनाथ महास्वामीजी हे त्यांच्या समाज सेवेप्रती असलेल्या तहहयात बांधिलकीसाठी सर्वत्र आदरणीय आहेत. त्यांनी असंख्य शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सेवा, सुविधा स्थापन केल्या. समाजाची सेवा हीच सर्वोच्च स्वरुपाची उपासना आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता आणि त्यांच्या शिकवणीने जात, पंथ आणि प्रदेशाचे अडथळे ओलांडून लाखो लोकांना प्रेरित केले.
* * *
माधुरी पांगे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai