Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 2 आणि 3 जानेवारी 2020 रोजी कर्नाटक दौऱ्याव


पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 आणि 3 जानेवारी 2020 रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत.

तुमकुर येथे ते श्री सिद्धगंगा मठाला भेट देतील. या ठिकाणी श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ एका संग्रहालयाची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल.

पंतप्रधान मठामध्ये प्रार्थना करतील, तसेच वृक्षारोपणही करतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा आणि सिद्धलिंगेश्वर स्वामींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.

******

S.Tupe/S.Kane/D.Rane