Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 22 डिसेंबरला एएमयूच्या शताब्दी समारंभाला करणार संबोधित


नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता  अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत. या समारंभात पंतप्रधान एका टपाल तिकिटाचेही प्रकाशन करणार आहेत. या विद्यापीठाचे कुलगुरू महामहिम सैदाना मुफद्दल सैफुदीन आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल नि:शंक हे देखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

 

एएमयू बद्दल

भारतीय विधान परिषदेच्या कायद्यान्वये 1920 साली मोहम्मेडन अँग्लो ओरीएंटल  महाविद्यालयाला (MAO) मध्यवर्ती विद्यापीठाचा दर्जा देऊन त्याचे अलिगढ मुस्लीम विद्यापीठात रुपांतर झाले. MAO कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी 1877 साली केली. उत्तरप्रदेशातील अलिगढ या शहरात 467.6 हेक्टर आवारात हे विद्यापीठ वसलेले आहे.  मालाप्पुरम (केरळ), मुर्शिदाबाद-जांगिपूर (पश्चिम बंगाल) आणि किशनगंज (बिहार) या  ठिकाणी या विद्यापीठाची उपकेंद्रे आहेत.

 

* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]