Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 23 मे रोजी नवी दिल्लीत रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिटचे करणार उद्घाटन


नवी दिल्ली, 22 मे 2025

ईशान्येकडील प्रदेशाला संधींची भूमी म्हणून अधोरेखित करण्याच्या, जागतिक आणि स्थानिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या, तसेच प्रमुख भागधारक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांना एकाच मंचावर आणण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान  नरेंद्र मोदी 23 मे रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे ‘रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट’ चे उद्घाटन करतील.

‘रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट’ 23-24 मे रोजी होणारा दोन दिवसांचा कार्यक्रम असून  केंद्र सरकारने, ईशान्येकडील राज्य सरकारांच्या सक्रीय पाठिंब्याने आयोजित केलेले विविध रोडशो, राज्यांच्या गोलमेज परिषदा, ज्यात राजदूत बैठक (Ambassador’s Meet) आणि द्विपक्षीय चेंबर्स बैठक  यांचा समावेश आहे, अशा शिखर परिषद – पूर्व  उपक्रमांचा हा सांगता समारंभ आहे. या परिषदेमध्ये मंत्रीस्तरीय सत्रे, बिझनेस-टू-गव्हर्न्मेंट सत्रे, बिझनेस-टू-बिझनेस बैठका, स्टार्टअप्स आणि गुंतवणूक प्रोत्साहनार्थ राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्रालयांनी हाती घेतलेल्या धोरणांचे आणि संबंधित उपक्रमांचे प्रदर्शन यांचा समावेश असेल.

गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रामुख्याने भर देण्यात येणाऱ्या क्षेत्रांमध्ये पर्यटन आणि आदरातिथ्य; कृषी-अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रे; वस्त्रोद्योग, हातमाग आणि हस्तकला; आरोग्यसेवा; शिक्षण आणि कौशल्य विकास; माहिती तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा; पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स; ऊर्जा; आणि मनोरंजन व क्रीडा यांचा समावेश आहे.

 S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com