Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 4 फेब्रुवारी रोजी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन करणार


 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 4 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11  वाजता  उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील  चौरी चौरा इथल्या चौरी चौरा शताब्दी समारंभाचे  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करतील. या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला 100 वर्षे पूर्ण होत असून  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ही  ऐतिहासिक घटना आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान चौरी चौरा शताब्दीला समर्पित टपाल तिकीटाचे प्रकाशनही करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील.

उत्तर प्रदेश सरकारद्वारा आयोजित शताब्दी समारंभ आणि विविध कार्यक्रम राज्यातील सर्व 75 जिल्ह्यात 4 फेब्रुवारी  2021 पासून सुरू होतील आणि ते 4  फेब्रुवारी 2022  पर्यंत चालू राहतील.

 

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]