पीएम्इंडिया
परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान म्हणाले की, स्वामीजी आपले मार्गदर्शक होते तसेच त्यांनी समाजाप्रती केलेली सेवा कायम स्मरणात राहील.
उद्या सकाळी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान गुजरातमधील सारंगपूर येथे जाऊन परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांचे अंत्यदर्शन घेतील.
करुणा आणि विनयशीलता या मूल्यांची जपणूक करत होते. समाजाप्रती त्यांनी केलेली सेवा कायम स्मरणात राहील.
“परमपूज्य स्वामी महाराज आपल्यासाठी मार्गदर्शक होते. त्यांच्याबरोबरचे आपले संबंध आपण कधीच विसरु शकणार नाही, त्यांचे अस्तित्व कायम स्मरणात राहील”, असे पंतप्रधान म्हणाले.
N. Sapre/S. Tupe/ D. Rane
After his address from the Red Fort tomorrow morning, PM will go to Sarangpur, Gujarat to pay his last respects to HH Pramukh Swami Maharaj.
— PMO India (@PMOIndia) August 14, 2016