Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला विद्यार्थी, शिक्षण आणि पालकांशी संवाद

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला विद्यार्थी, शिक्षण आणि पालकांशी संवाद

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला विद्यार्थी, शिक्षण आणि पालकांशी संवाद

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला विद्यार्थी, शिक्षण आणि पालकांशी संवाद


नवी दिल्लीत तालकटोरा मैदानावर आज आयोजित करण्यात आलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. जवळजवळ दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात परीक्षेतील ताणतणाव दूर करण्यासाठी हलकाफुलका संवाद साधण्यात आला.

या कार्यक्रमात यंदा परदेशातले विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात करताना या ठिकाणी लघु भारताचे रुप आपल्याला दिसत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तुम्ही सगळे विद्यार्थी भारताचे भविष्य आहात, असे सांगत तुम्हाला घडवणारे पालक आणि शिक्षक देखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

मुलांकडून अवास्तव अपेक्षा बाळगून त्याचे ओझे मुलांवर टाकणाऱ्या आणि स्वत:ही तणावग्रस्त असणाऱ्या पालकांना काय सल्ला द्यावा, असा प्रश्न एका शिक्षकाने त्यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, परीक्षेचा काहीही परिणाम होणार नाही, असे शक्य नाही. मात्र, संपूर्ण आयुष्यात त्याचे किती महत्त्व आहे हे समजून घ्यायला हवे. परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे, आयुष्यातला केवळ एक भाग असतो, हे समजले तर तणाव आपोआप कमी होईल.

आपली अपुरी राहिलेली स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत, अशी अपेक्षा पालकांनी लादू नये. प्रत्येक मुलाच्या आपापल्या क्षमता आणि गुणवत्ता असते ती समजून घेत त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी अपेक्षा किंवा महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही, असेही ते म्हणाले. निराशा आणि दु:खाच्या वातावरणात कोणीही जगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

अपेक्षा हे ध्येय बनू देऊ नका, असे सांगत असताना मोदी यांनी स्वत:चे उदाहरण दिले. पंतप्रधान म्हणून मोदी यांच्याकडून जनतेच्या जास्तीत जास्त अपेक्षा आहेत, असे काही जणांचे मत आहे. मात्र, माझ्यासाठी सव्वाशे कोटी भारतीयांच्या सव्वाशे कोटी अपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत, असे सांगत आपण त्या पूर्ण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले.

एका पालकाने ऑनलाईन गेम्सचे मुलांमध्ये वाढत असल्याचे वेड कमी करण्याविषयी प्रश्न विचारला त्यावर उत्तर देतांना पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञान स्वत: चांगले किंवा वाईट नसते, त्याचा आपण कसा वापर करावा हे मुलांना शिकवायला हवे. त्यांना तंत्रज्ञानापासून दूर न करता त्याचा योग्य वापर शिकवणे हे पालकांचे काम आहे. मात्र, प्ले स्टेशनवर खेळताना, खेळांच्या मैदानांचा विसर पडू देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला. मोदी स्वत: वेळेचे व्यवस्थापन कसे करतात आणि त्यांना थकवा येत नाही का? असे विचारले असता सगळा देश माझे कुटुंब आहे, अशा भावनेतून मी काम करतो आणि कुटुंबासाठी झटताना तुम्हाला कधीही थकवा येत नाही, असे मोदी म्हणाले. सकात्मकतेने काम केल्यास त्यातून अधिकाधिक ऊर्जा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

करिअरसाठी विषयांची निवड कशी करावी यावर झालेल्या चर्चेत तुम्हाला काय आवडते ते करिअर म्हणून निवडा असा आग्रह त्यांनी केला. आज प्रत्येक क्षेत्रात संधी आहे, त्यामुळे केवळ विज्ञान, गणित असे विषय निवडण्याची सक्ती करू नये. मुलांची स्पर्धा इतरांशी नाही तर स्वत:शी असावी, असा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. परीक्षा केवळ पास होण्यासाठी नसाव्यात तर विद्यार्थी खरोखर काय शिकले हे जाणून घेण्यासाठी असाव्यात. शिक्षणाचा उपयोग आयुष्यातील आव्हाने पेलण्यासाठी करता यायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. विद्यार्थ्यांनी निराशेच्या गर्तेत जाऊ नये असे सांगत आपल्या निराशेविषयी तसेच मानसिक अस्वस्थतेविषयी मुलांनी मोकळेपणांनी संवाद साधावा. पालकांनीही मुलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

B.Gokhale/R.Aghor/P.Kor