पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 13 जुलै 2026
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी जाहीर केले की प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले :
“पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटल्याने झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी.
पीएमएनआरएफकडून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”
The loss of lives due to the capsizing of a boat in the South 24 Parganas district of West Bengal is deeply painful. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. May the injured recover at the earliest.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given…
— PMO India (@PMOIndia) July 13, 2026
পশ্চিমবঙ্গের দক্ষিণ ২৪ পরগনা জেলায় নৌকাডুবিতে প্রাণহানির ঘটনা অত্যন্ত বেদনাদায়ক। শোকসন্তপ্ত পরিবারগুলিকে জানাই সমবেদনা। আহতদের দ্রুত আরোগ্য কামনা করি।
প্রধানমন্ত্রীর জাতীয় ত্রাণ তহবিল থেকে প্রত্যেক মৃতের নিকটাত্মীয়কে ২ লক্ষ টাকা অনুদান দেওয়া হবে। আহতদের দেওয়া হবে ৫০,০০০…
— PMO India (@PMOIndia) July 13, 2026
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai