Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पश्चिम बंगालमधील बिरभूम येथील आग दुर्घटनेतील जीवितहानीबाबत पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये बिरभूम येथील आग दुर्घटनेत नागरिकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमवावे लागलेल्यांप्रती सहवेदना व्यक्त केल्या असून लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. या दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासन सक्रिय मदत करत आहे असेही ते म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाच्या ‘एक्स’वरील संदेशात नमूद केले आहे की,

“पश्चिम बंगालमध्ये बिरभूम इथे आगीत काही जणांना जीव गमवावा लागल्याचे ऐकून खूप दुःख झाले. आपल्या प्रियजनांना गमवावे लागलेल्या नागरिकांप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन या दुर्घटनेतील बाधितांना मदत करत आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी”

 

* * *

नितीन फुल्लुके/सुरेखा जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai