पीएम्इंडिया
पहल योजनेमध्ये 10 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. जगातील रोख हस्तांतरण योजनांमधील पहल ही योजना सर्वात मोठी योजना ठरली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. यशाबद्दल मोदी यांनी लाभार्थी तसेच अधिकाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे. पहल योजनेमुळे काळाबाजार संपुष्टात येऊन लोकांपर्यंत जास्त प्रभावीपणे अनुदान, थेट पोहोचू शकणार आहे. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.