Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पहिल्‍या संविधान दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


पहिल्या संविधान दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संविधानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

“पहिल्या संविधान दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी भारतीय जनतेला शुभेच्छा. हा दिवस तुम्हाला संविधानाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरित करो.

भारताला संविधान प्राप्त व्हावे म्हणून ज्या महान स्त्री-पुरुषांनी अथक कार्य केले त्या सर्वांना हा दिवस म्हणजे श्रध्दांजली आहे. आम्हाला त्या सर्वांचा अभिमान आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण केल्याविना संविधान ही संकल्पना आपण मनात आणूच शकत नाही. मी त्यांना अभिवादन करतो.

चला आपण आपल्या संविधानाच्या तत्व आणि मूल्यांचे नेहमी जतन करुया आणि एक असा भारत घडवूया ज्याचा आपल्या पूर्वजांना अभिमान वाटेल”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

S.Mhatre/S.Tupe/N.Sapre