पीएम्इंडिया
पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद नवाझ शरीफ यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला.
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असणाऱ्यांवर आणि या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या संघटना तसेच व्यक्तींवर पाकिस्तानने तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याच्या गरजेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला. यासंदर्भात पाकिस्तानला विशिष्ट आणि कारवाई करण्यायोग्य माहिती पुरवण्यात आली आहे.
दहशतवाद्यांविरोधात आपले सरकार त्वरीत आणि निर्णायक कारवाई करेल, असे ठाम आश्वासन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
J. Patankar/ S. Tupe/ M. Desai