पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पारंपरिक औषध व्यवस्था क्षेत्रात सहकार्यासाठी म्यानमारसोबत सामंजस्य कराराला मंजुरी दिली.
दोन्ही देशांमध्ये आयुष/म्यानमारमधील पारंपरिक औषध व्यवस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य वाढविण्याबाबत हा करार महत्त्वाचा ठरणार आहे. आयुष व्यवस्थेतील औषधे, त्यांचे संवर्धन, उत्पादन आणि प्रमाणन याला यामुळे उभारी मिळेल.
B.Gokhale/M.Pange/P.Kor