पीएम्इंडिया
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या तिहेरी उडी (ट्रिपल जंप) स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रवीण चित्रावेल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करत म्हटले आहे की, प्रवीण चित्रावेल यांनी रौप्यपदकासह आपल्या क्रीडा कारकिर्दीतील सर्वोत्तम उडीचीही नोंद केली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करत पंतप्रधानांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
समाजमाध्यम ‘एक्स’ वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याबरोबरच आपल्या क्रीडा कारकिर्दीतील सर्वोत्तम उडीची नोंद करणाऱ्या प्रवीण चित्रावेल यांच्या यशाचा आपल्याला आनंद आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.”
#CWG2026”
Delighted that Praveen Chithravel has won a Silver Medal in the Men’s Triple Jump event at the 2026 CWG and also registered a best jump of his sporting journey. Congratulations to him. Wishing him every success in the journey ahead.#CWG2026
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2026
***
यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]