पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 18 जून 2026
पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी फ्रान्समधील विविध क्षेत्रांमध्ये भारतीय समुदायाचे उल्लेखनीय योगदान अधोरेखित केले. त्यांनी भारतीय नवोन्मेष आणि संकल्पना जागतिक बाजारपेठांशी जोडण्यात तसेच भारत–फ्रान्स विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीला बळकटी देण्यात भारतीय समुदायाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेतली.
भारत आणि फ्रान्स यांच्या जनतेतील परस्पर संबंध दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकाधिक भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक फ्रान्सची गंतव्यस्थान म्हणून निवड करीत असल्यामुळे या संबंधांची व्याप्ती वाढली आहे, असे त्यांनी सांगितले. जनतेच्या येण्या-जाण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचेही त्यांनी कौतुक केले. फ्रान्समध्ये यूपीआयचा वाढता प्रसार लक्षात घेता, यामुळे भारत आणि फ्रान्स यांच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतात घडून येत असलेल्या परिवर्तनकारी बदलांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. सर्वसमावेशक, तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीविषयी त्यांनी सांगितले. गेल्या 12 वर्षांत भारताने 250 दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढल्यावर त्यांनी भर दिला.
ब्रिटन आणि युरोपीय संघाबरोबर झालेल्या व्यापारविषयक करारांमुळे भारतीय कामगार, शेतकरी, नवोन्मेषकांसह इतरांसाठीही नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले. नाईस इथे आयोजित भारत इनोव्हेट्स 2026 आणि पॅरीस इथे झालेल्या विवटेक 2026 मधील भारताच्या सहभागाविषयी सांगताना, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जागतिक समुदायासाठी पसंतीचा भागीदार बनत आहे, असे ते म्हणाले.
भारत इनोव्हेट्सच्या यशाबद्दल त्यांनी नमूद केले की, हे व्यासपीठ नवोन्मेषाधारित धोरणाचे एक आदर्श मॉडेल ठरत आहे. एविअन इथे झालेल्या जी-7 शिखर परिषदेतील आपल्या सहभागाचा उल्लेख करत ते म्हणाले, ग्लोबल साऊथला समान भागीदार म्हणून स्थान दिले जाईल अशा विश्वासावर आधारित आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्याच्या भूमिकेवर भारत ठाम आहे. डिजिटल युगातील विविध आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी भारतातील प्रतिभा, कौशल्य आणि नवोन्मेष जगाला मोलाची मदत करीत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतीय वंशाच्या नागरिकांना भारताच्या प्रगतीत योगदानाचे आणि विकसित भारताच्या प्रवासात भागीदार होण्याचे आवाहन त्यांनी केले.
या संवादात भारत आणि फ्रान्स यांच्या जनसमुदायांतील दृढ संबंधांचे प्रतिबिंब दिसून आले. तसेच, जगभरातील भारतीय वंशाच्या नागरिकांचे कल्याण, हितसंबंध आणि त्यांच्याशी सातत्यपूर्ण संवाद व सहभागाप्रती भारताची वचनबद्धता पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली.
* * *
नाना मेश्राम/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Addressing the Indian community in Paris. Their deep affection for India and contribution to stronger India-France ties are truly commendable. https://t.co/sNLYVfzaV1
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2026
In the last 12 years, India has witnessed transformative growth across sectors. pic.twitter.com/xNqrf2sMDA
— PMO India (@PMOIndia) June 18, 2026
Beyond economic growth, India's journey is about empowering people and transforming lives. pic.twitter.com/eC2dxDTcfM
— PMO India (@PMOIndia) June 18, 2026
This is a defining period in India's journey, where aspirations are reaching new heights pic.twitter.com/zgCvkutax0
— PMO India (@PMOIndia) June 18, 2026
India is investing across sectors that will drive growth, innovation and opportunity for generations to come. pic.twitter.com/bM4pTf2VED
— PMO India (@PMOIndia) June 18, 2026
India is emerging as a trusted partner to the world. pic.twitter.com/STnp3ngaDN
— PMO India (@PMOIndia) June 18, 2026