Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पोलिस स्मृती दिनी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रीय राखीव पोलिस दलातील हुतात्म्‍यांबाबतच्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन

पोलिस स्मृती दिनानिमित्त 21 ऑक्टोबर रोजी आज नवी दिल्लीत “योध्यांचे स्मरण” या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. कर्तव्य बजावतांना प्राणाची आहुती देणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलातल्या शूर जवानांच्या स्मृतींना हे पुस्तक अर्पण करण्यात आले आहे.

प्रत्येक पोलिस दलाने अधिकारी आणि जवानांच्या शौर्य कथांचे एकत्रिकरण केले पाहिजे, म्हणजे भावी पिढयांसाठी ते प्रेरणादायी ठरतील, अशी इच्छा पंतप्रधानांनी 2014 मध्ये पोलिस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेत व्यक्त केली होती.

देशभरातल्या केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या प्रत्येक तळावर हुतात्म्यांच्या कुटुंबियांना या पुस्तकाची प्रत भेट देण्यात येईल.

J.Patnakar/S.Tupe