पीएम्इंडिया
कार्यक्षम प्रशासन आणि जलद अंमलबजावणीसाठी तयार केलेले बहु-आयामी ऑनलाईन व्यासपीठ “प्रगती” च्या द्वारे पंतप्रधानांनी आज संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
ग्राहकांच्या तक्रार निवारणाबाबत पंतप्रधानांनी माहिती घेतली. ई-कॉमर्स क्षेत्रातील कामांसाठी अनेक तक्रारी आल्या असून, त्यांचे निवारण जलदगतीने करावे, असे पंतप्रधान म्हणाले. तक्रारींच्या निवारणाबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि वेळोवेळी प्रगतीचा आढावा घ्यावा, असेही ते म्हणाले.
त्याशिवाय, पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांतल्या रस्ते, रेल्वे, ऊर्जा, कोळसा आणि खाणकाम क्षेत्रातल्या प्रकल्पांचा आढावा घेतला.
देशभरात सौरपंप बसवण्याच्या योजनेच्या कामाचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सौरपंपांच्या आधारे पिण्याचे पाणी पोहोचवावे, अशी सूचना त्यांनी केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, देशात पूरजन्य स्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या आपत्ती व्यवस्थापन तयारीचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला.
R.Aghor/B.Gokhale
Today’s PRAGATI session was marked by extensive discussions on road, rail, coal projects and water conservation. pic.twitter.com/esNEkvbGnY
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2016
The issue of preparedness for dealing with floods came up during PRAGATI session. Urged states to ensure efficacy of relief mechanisms.
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2016
Reviewed progress towards installing solar pumps, which will help provide clean drinking water in remote areas. https://t.co/6rdR8ijlVw
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2016