Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘प्रगती’च्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद

‘प्रगती’च्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद


प्रगती अर्थात आयसीटी आधारित बहुपर्यायी व्यासपीठ Pro-Active Governance and Timely Implementationच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चौदाव्या संवाद कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.

शालेय शिक्षण आणि साक्षरतेसंदर्भातील गाऱ्हाण्यांची हाताळणी आणि समाधान याबाबतच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. सरकार आता आपली गाऱ्हाणी सोडवू शकेल, अशी आशा आता लोकांना वाटू लागली आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची एक निश्चित यंत्रणा तयार करावी असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व उपलब्‍ध तांत्रिक साधने वापरावी, अशी सूचना त्यांनी केली. अवकाश तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना सर्व मंत्रालयांना यापूर्वीच देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे परिक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यात जाणवणाऱ्या अडचणी कमी होऊ शकतील, असे पंतप्रधान म्हणाले.

सुगम्य भारत अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेताना पंतप्रधानांना शाळा, सार्वजनिक इमारती, रेल्वे स्थानके इ. ठिकाणी पोहोचण्याबाबतीत झालेल्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याबाबत केंद्र आणि राज्य शासनांच्या विविध भागांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे त्यांनी कौतुक केले.

आधार नोंदणीच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करतांना एकूण नोंदणीची संख्या 105 कोटींपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. ईशान्येकडील राज्यांमध्ये आधार नोंदणीसाठी विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि अन्य शैक्षणिक लाभ देता यावेत, यासाठी 5 ते 18 वयोगटातील बालकांच्या नोंदणीला चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र, पंजाब, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममधील रस्ते, रेल्वे आणि ऊर्जासंबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. यात 1981-82 साली मंजुरी प्राप्त नांगल धरण-तलवारा रेल्वे मार्ग या प्रलंबित प्रकल्पाचाही समावेश होता. या प्रकल्पातील अधिक विलंब टाळण्यासाठी निम्नस्तरातील कामाला चालना द्यावी असे पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या मुख्य सचिवांना सांगितले.

B.Gokhale/M.Pange/P.Kor